Tuesday, November 19, 2024
spot_img
Homeगोंदियाजिल्ह्यातील 40 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती

जिल्ह्यातील 40 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती

गोंदिया: लोकशाहीत मतदान हा प्रत्येक 18 वर्षांवरील नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, आणि तो बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. प्रशासनाने मतदानाच्या जनजागृतीसाठी स्वीप (सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोरल पार्टिसिपेशन) अंतर्गत विविध उपक्रम राबवून मतदानाचे महत्त्व सांगण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये 40 मतदान केंद्रांचे संपूर्ण नियंत्रण महिलांच्या हाती सोपवले आहे.

या महिला-केंद्रित मतदान केंद्रांवर अधिकाऱ्यांपासून सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व जबाबदाऱ्या महिलाच पार पाडणार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे, यामुळे महिला मतदारांना अधिक सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

महिला मतदान केंद्राची निर्मिती म्हणजे महिलांना त्यांच्या हक्काच्या मतदान प्रक्रियेत अधिक सक्रिय करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. महिलांचे योगदान लोकशाहीला बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

महिला मतदान केंद्रांची यादी

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ:

112-वडेगाव

127-बौध्दनगर

128-कोदामेडी

129-सडक/अर्जुनी

160-बाम्हणी/सडक

242-धाबेटेकडी अ.

244-महालगाव

257-निलज

267-मालकनपूर

285-येरंडी

तिरोडा विधानसभा मतदारसंघ:

78-तिरोडा

80-तिरोडा

90-तिरोडा

109-खैरबोडी

125-काचेवानी

252-कुऱ्हाडी

262-कटंगी बुज.

265-गोरेगाव

275-हिरडामाली

285-घोटी

गोंदिया विधानसभा मतदारसंघ:

178-गोंदिया

179-गोंदिया

225-गोंदिया

226-गोंदिया

227-गोंदिया

257-गोंदिया

258-गोंदिया

259-गोंदिया

260-गोंदिया

261-गोंदिया

आमगाव विधानसभा मतदारसंघ:

61-रिसामा

80-आमगाव

83-आमगाव

84-आमगाव

85-आमगाव

167-आमगाव खुर्द

171-सालेकसा

243-देवरी

245-देवरी

248-देवरी

महिला मतदान केंद्र (पिंक पोलिंग स्टेशन) उभारणीमागील उद्देश महिलांचा सहभाग वाढवून लोकशाही बळकट करण्याचा आहे. प्रशासनाच्या या पुढाकारामुळे महिलांना प्रेरणा मिळेल, तसेच मतदान प्रक्रियेत त्यांचा सहभाग अधिकाधिक सुनिश्चित केला जाईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments