Wednesday, December 11, 2024
spot_img
Homeगोंदियाधर्माच्या संरक्षणासाठी शिवचैतन्य जागरण यात्रेतून एकजुटीचा संदेश

धर्माच्या संरक्षणासाठी शिवचैतन्य जागरण यात्रेतून एकजुटीचा संदेश

गोंदिया –आपला हिंदू धर्म केवळ धार्मिक परंपरांचाच आधार नसून तो जीवनाचे मूल्यवर्धन करणारा आहे. धर्म भारताच्या अस्तित्वाचा डीएनए आहे. मात्र, सध्याच्या काळात आपला धर्म विरोधी शक्तींच्या लक्ष्यावर आहे. त्यामुळे धर्माचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असून त्यासाठी हिंदूंमध्ये एकजूट आवश्यक आहे. “आधी आपण हिंदू आहोत, त्यानंतर माळी, कुणबी, ब्राह्मण किंवा इतर. ‘ना बटेंगे, ना कटेंगे, जितकर रहेंगे,’ हे लक्षात ठेवले पाहिजे,” असे प्रतिपादन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (अयोध्या) चे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी केले.शिवचैतन्य जागरण यात्रेच्या निमित्ताने गोंदियातील नेहरू चौकात आयोजित सभेत गिरी महाराज बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात समाजसेवक सुधीर बजाज होते.

या कार्यक्रमाला संत लहरी आश्रम संस्थान कामठाचे पीठाधीश डॉ. खिलेश्वरनाथ खरकाटे (तुकड्याबाबा), ब्रह्माकुमारी प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बी. के. रत्नमाला दीदी, यशेश्वरानंद महाराज, आणि संत सेवकराम टेकाम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.गिरी महाराज म्हणाले, “देश अनेक गंभीर समस्यांचा सामना करत आहे, आणि त्या समस्यांवर उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी लागेल. सुमारे ३५० वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देशासाठी एक प्रकाशझोत ठरला. त्यांच्याच विचारांवर आधारित मार्गदर्शन आपण आजही स्वीकारले पाहिजे.”त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील संघर्ष, नेतृत्व, आणि त्याग यांचा आदर्श अंगिकारण्याचे आवाहन केले.

“आपल्या देशाच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी, योग्यतेनुसार कोणाला शरण जावे व कोणाच्या विरोधात उभे राहावे हे ठरवणे महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिक, मातृशक्ती आणि युवक उपस्थित होते. या कार्यक्रमातून हिंदू समाजामध्ये धर्म, संस्कृती, आणि राष्ट्रीय अस्मितेची जाणीव अधिक प्रखर करण्याचा संदेश देण्यात आला. शिवचैतन्य जागरण यात्रा गोंदियासारख्या ठिकाणी धर्मप्रेमींच्या एकजुटीचे द्योतक ठरली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments