गोंदिया :ग्राम सतोना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बूथ कमिटीची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमूख उपस्थितीत व कार्यकर्त्यांच्या मोठया उत्साहपूर्ण वातावरणात बैठक संपन्न झाली. पक्षाची संगठणात्मक बांधणी करण्यासाठी बूथ कमिटीचे गठण करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक बुथवर कमिटी स्थापन करण्यात यावी असे माजी आमदार राजेंद्र जैन कार्यकर्त्यांना संबोधित केले,या परिसरातील शेतीच्या सिंचनासाठी खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने रजेगाव – काटी उपसा सिंचन, डांगोरर्ली उपसा सिंचन उच्च पातळी बंधाऱ्याचे काम, पूर परिस्थिती, धान पिकांवर रोगराईमुळे उत्पन्नात झालेल्या घटिमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती करिता यावर्षी सुध्दा हेक्टरी 25 हजार रुपये मिळवुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच या क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत कामे, कोरणी घाट तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी विकास निधी देण्याचे काम खा. प्रफुल पटेल यांनी केलें आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत विज, लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व आर्थिक व सामाजिक सबलीकरण होणारं आहे. सरकार सामाजिक परिवर्तनासाठी सर्व स्थरावर प्रयत्न करीत आहे. या भागाच्या विकासासाठी येत्या निवडणुकीत खा. प्रफुल पटेल यांच्या निर्णयाला सार्थ ठरविण्याची वेळ आली आहे. असे मार्गदर्शन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, कुंदनभाऊ कटारे, गणेश बरडे, रविकुमार पटले, नेहा तुरकर, केतन तुरकर, रामलाल उईके, डॉ श्याम भाऊ तुरकर, शिवलाल जामरे, राजेश जमरे, ओमप्रकाश ठाकरे, नाजीम शेख, रणजित रामटेके, रेखलाल राऊत, बबिता पाचे, बलूराम पाचे, ममता गायकवाड, शहावंती कावरे, दयावती शहारे, गंगाराम मानकर, प्रवेश अवस्थी, दुर्गाप्रासाद तुरकर, संभु असाटी, मदन बीसेन, तेजराम सहारे, सुनिल पटले, ईस्वर मानकर, शैलेश वासनिक, छोटेलाल जामरे, सुरेश तुरकर, रौनक ठाकूर सहित मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.