Friday, December 13, 2024
spot_img
Homeगोंदियामत्स्य पालनावर अवलंबून असलेल्या ढिवर समाजालाही मिळणार मोदी आवास योजनेचा लाभ -...

मत्स्य पालनावर अवलंबून असलेल्या ढिवर समाजालाही मिळणार मोदी आवास योजनेचा लाभ – आमदार विनोद अग्रवाल

गोंदिया : जलाराम लॉन येथे आयोजित मत्स्य पालन व्यवसाय करणाऱ्या ढिवर (मच्छीमार) समाजाच्या बैठकीत हजारो महिला, पुरुष व युवकांनी हजेरी लावली.

गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार व महायुतीतील भाजपा उमेदवार विनोद अग्रवाल यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “मी जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष असताना, गोंदिया जिल्ह्यातील जवळपास ५०० मामा तलावांच्या दुरुस्तीवर काम केले. मत्स्य पालन करणाऱ्या समाजाला कसा लाभ मिळू शकेल यासाठी कटिबद्ध होतो.”

“गोंदियात जनतेने मला प्रतिनिधित्व दिल्यानंतर सर्व समाजाच्या उत्थानासाठी काम करण्याचे ध्येय ठेवले आणि ढिवर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले,” असेही त्यांनी सांगितले.

विनोद अग्रवाल म्हणाले, “काँग्रेसच्या प्रतिनिधींनी ढिवर समाजाच्या उत्थानासाठी कधीच विचार केला नाही, परंतु आम्ही प्रयत्नशील राहून समाजाला आवास योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासनाला विनंती केली आणि एनटी वर्गाला मोदी आवास योजनेत समाविष्ट केले.”

गोंदियात मत्स्य पालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी मच्छी मार्केट यार्ड उभारण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. मत्स्य पालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत, परंतु गोंदियात कार्यालय नसल्यामुळे त्या योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments