Tuesday, November 19, 2024
spot_img
Homeगोंदियासर्वसामान्यांच्या विकासासाठी महायुतीला साथ द्या - वर्षा पटेल

सर्वसामान्यांच्या विकासासाठी महायुतीला साथ द्या – वर्षा पटेल

गोंदिया : मतदार संघाच्या प्रगती, समृद्धीसाठी, महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी, युवकांच्या रोजगारासाठी आणि शेतकरी व शेतमजुरांच्या उत्थानासाठी महायुतीला साथ देत बहुमतानं निवडून देण्याचं आवाहन वर्षा प्रफुल्ल पटेल यांनी केलं. त्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारासाठी गोरेगाव तालुक्यातील ब्राम्हणी येथे आयोजित सभेत बोलत होत्या.

वर्षा पटेल यांनी लोकांना आवाहन केलं की, “येत्या २० तारखेला जास्तीत जास्त मतदान करा आणि महायुतीला प्रचंड बहुमतांनी निवडून द्या, जेणेकरून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येईल.” त्यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेवर विशेष लक्ष देण्याचं आश्वासन दिलं, तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि शेतकरी व शेतमजुरांच्या कल्याणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं.

या सभेत वर्षा प्रफुल्ल पटेल यांच्यासह केवल बघेले, कल्पना बहेकार, मायाताई चौधरी, गीता बिसेन, प्राची ठाकूर, बेबी परिहार, कल्पना शेवटे, श्रद्धा रहांगडाले, ललिता पुंडे, शशी ताराम, वंदना पटले, भारती बिसेन, सुशीला कटरे, वर्षा वैद्य, खिलेश्वरी परिहार, कल्पना गजभिये, हौशीला मडावी, रितू बिसेन, गीता भलावी, मेसंधी मेश्राम, सीमा बिसेन, संगीता बिसेन, बाबा बोपचे, बाबा बहेकार, लालचंद चव्हाण, पराग चौधरी, सुरेंद्र रहांगडाले, रमेश बिसेन, नीलकंठ गौतम, उमेश बिसेन, तिलक कटरे, उमेन्द्र बिसेन, प्रल्हाद बिसेन, राजेन्द्र बिसेन, सुखदेव कटरे, पराग चौधरी, यशपाल पटले, भारत भलावी, ओमकार भलावी, गोपाल भगत, देतराम पटले, अनिल गौतम आणि इतर महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्षा पटेल यांनी यावेळी महायुती सरकारच्या विकास कार्यांविषयी सविस्तरपणे चर्चा केली आणि या कामांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महायुती सरकारचं असणं गरजेचं असल्याचं लोकांना सांगितलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments