सुपर वूमन शिवजन्मोत्सव उत्साहात साजरी
गोंदिया :कुठल्याही मातेला स्वतःच्या पुत्र मोहापेक्षा काहीही प्रिय नसते . परंतु माँसाहेबांनी असा विचार मात्र कधीच केला नाही . स्वराज्य निर्माण करण्यात माँसाहेब जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे . फक्त मुघलांपासून रक्षण करणे एवढेच नव्हे तर , न्यायनिवाड्याची कामे , नेतृत्व कौशल्य आणि एक मुस्तद्दी राजकारणी असे स्वतःमधील अनेक गुण सुद्धा त्यांनी शिवबांना दिले अश्या अनेक मूल्यशिक्षणाद्वारे जिजाऊंनी शिवबा घडविण्याच्या आठवणींना उजाळा सुपर वूमन द्वारा शिवजन्मोत्सव निमित्त आयोजित मी घडविलेला शिवबा एकपात्री अभिनय स्पर्धेत सहभागी जिजाऊंनी यावेळी दिला.
युवा पर्व सुपर वूमन द्वारा शिवजन्मोत्सव नगर परिषद गार्डन लोहिया वार्ड येथे विविध स्पर्धांच्या माध्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून उत्साहात साजरा करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ समाज सेविका शर्मिला पाल तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर सेविका भावना कदम ,नगर परिषदेच्या प्रकल्प अधिकारी सुनंदा बिसेन ,रक्त संक्रमण अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर ,अनाथांची माय डॉ सविता बेदरकर ,जेष्ठ साहित्यिक मीना डुंबरे ,उप कार्यकारी अभियंता शिखा पिंपलेवार,समाजसेविका दृष्टी बोबडे,सुपर वूमन च्या संचालिका प्राची गुडधे उपस्थित होते.
यावेळी मी घडविलेला शिवबा – एकपात्री अभिनय स्पर्धेत नूतन मेश्राम,मोनिका पटले,अल्का पारधी,समीक्षा पटले,पौर्णिमा साठवणे,श्रुती केकत,संगीता मिश्रा,पूजा गायधने यांनी सहभाग घेतला तर लहान मुलांमध्ये आतापासून शिवबा व जिजाऊ यांच्या बद्दल माहिती व्हावे म्हणून वेशभूषा स्पर्धा -जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यामध्ये लक्ष कटरे ,मिहीर गायधने,पार्थ दियेवार,धैर्य टीकारीहा , नायरा,वेध केकत,सूर्यास पटले,नमन इंगळे,हिरल गुडधे,परिधी पटले,आरुषी इंगळे यांनी सहभाग घेतला तसेच महिलांकरिता बौद्धिक खेळ घेण्यात आले.
सुपर वूमन द्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले त्यात ऑनलाईन उखाणे स्पर्धेत श्रुती केकत प्रथम ,सुषमा पिल्लारे द्वितीय व नूतन मेश्राम तृतीय स्थानी पटकावले .शॉर्ट विडिओ डान्स स्पर्धेत नेहा मिश्रा प्रथम,नेहा ठाकूर द्वितीय व श्रुती केकत तृतीय ,एकपात्री अभिनय स्पर्धा मी घडविलेला शिवबा या मध्ये प्रथम मोनिका पटले,द्वितीय समीक्षा पटले,श्रुती केकत तृतीय यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.वेशभूषा स्पर्धेत शिवबा- प्रथम वेद केकत, द्वितीय सुर्यांश पटले,तृतीय नमन इंगळे तर जिजाऊ वेशभूषेत प्रथम आरुषी इंगळे, द्वितीय मायरा तृतीय हिरल गुडधे यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे बहारदार संचालन संध्या डोंगरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन मोना दियेवार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुपर वूमनच्या संचालिका प्राची गुडधे,भूमिका टीकारीहा,समीक्षा पटले,सुनीता ठाकूर,पूजा मेंढे,माधवी गिऱ्हे,सुषमा आमकर,देवकी बघेल,आशा बेले,शिल्पा तिडके,मनीषा सोनुले,तृप्ती चौरागडे,माधुरी मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.