गोंदिया : आगामी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांची घोषणा केली आहे. गोंदिया मतदारसंघात यापूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेले विनोद अग्रवाल हे पक्षातून निलंबन मागे घेतल्यानंतर भाजपचे प्रतिनिधित्व करतील . आमगाव मतदारसंघात संजय पुराम , तर तिरोडा मतदारसंघात भाजपने विजय रहांगडाले यांची उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात लक्षणीय राजकीय घडामोडी पाहायला मिळत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक उमेदवारही इच्छुक आहेत.अद्याप नावे घोषित केली गेली नाहीत.