गोंदिया : महाराष्ट्रातील ५० पेक्षा अधिक मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरीय आणि मतदारसंघनिहाय घोषणापत्र जाहीर करण्यात आले. गोंदिया येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी घोषणापत्र सादर करत, मागील कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला आणि आगामी काळातील वचनांची पूर्तता करण्याच्या दृढ निश्चयाचा पुनरुच्चार केला.
या प्रसंगी पक्षाने मतदारसंघनिहाय घोषणापत्राची माहिती, तसेच महाराष्ट्रवादी हेल्पलाइनच्या माध्यमातून उमेदवारांची माहिती आणि मतदारसंघातील विकासकामांची माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन केले. या घोषणेमुळे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला असून, राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेप्रतीची कटिबद्धता आणि पुढील विकासाची स्पष्ट रूपरेषा दर्शवली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या या घोषणापत्रामुळे गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रातील जनतेसमोर पक्षाची आगामी योजना आणि विकासविषयक धोरण स्पष्ट झाली आहेत असे खासदार पटेल यांनी सांगितले.