शिक्षक सहकार संघटना’ जिल्हा शाखा भंडारा ची कार्यकारणी जाहीर.
अरविंद तिरपुडे जिल्हाध्यक्ष अनिल पटले सचिव म्हणून सर्वांणुमते निवड झाली
भंडारा :-आज शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मध्ये दिवसेंन दिवस मोबाईल च्या जास्त वापरामुळे दुरावा निर्माण होत आहे.यामुळे मुलांना व शिक्षकांना आज विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्या समस्या संघटने मार्फत योग्य प्रकारे हाताळून विद्यार्थी व शिक्षकांच्या हिताचे कार्य करावे असे आव्हाहन शिक्षक सहकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष रवींद्र अंबुले यांनी भंडारा जिल्हा शाखेची कार्यकारणी जाहीर करतांना केले .
संतोष पिट्टलवाड राज्याध्यक्ष शिक्षक सहकार संघटना यांच्या सूचनेनुसार तसेच भंडारा जिल्ह्यातील शिक्षकांच्या आग्रहास्तव दि. 20/07/2024 रोजी रवींद्रकुमार अंबुले विभागीय अध्यक्ष नागपुर यांच्या अध्यक्षतेखाली शासकिय विश्राम गृह भंडारा येथे शिक्षक सहकार संघटनेची सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे सुरेंद्र गौतम जिल्हाध्यक्ष गौदिया,चंद्रभान दशमेर , प्रमोद शहारे ,लाखेश्वर लंजे सचिव,श्री जगणे श्री मरस्कोले के. प., श्री. मेढे , बी उपराडे होते
यावेळी पुढील प्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आली
जिल्हाध्यक्ष अरविद बुधाजी तिरपुडे, सचिव फनिलकुमार मनोहर पटले, कार्याध्यक्ष – सुरेंद्र छोटेलाल ठाकरे कोषाध्यक्ष समिर वहाब शेख, उपाध्यक्ष- उसेण चंद्रभान गौडाने,. सदिय आनंदराव आनंदराव सोल्लाई, श्री विरद्रसेन शिवदास देशभ्रतार, प्रसिद्धी प्रमुख. देव विठ्ठल झलके,. सुभाष आसाराम कठाणे, संघटक शाहीट अनिस शेख, सचिन सुरेश मेश्राम,किरणकुमार उत्तम चव्हाण, महेश मारत बच्हाण, मार्गदर्शक रविंद्र बढ़ीनाय उगलमुगले, विधी सल्लागार. आशिष ब्रिजलाल बेळकर, तपसहाय्यक वी शैलेश निलकंठ खेताळे जिल्हा प्रतिनिधी दिनेश खानुजी रामटेके दशरथ गोपाळ वाट महिला प्रतिनिधी करुणा धनिराम मेश्राम, स्वेता बाबुलाल भुजाडे,अमृता सुधाकर सेलोकर, ज्योती किरणकुमार चव्हाण. यावेळी प्रविण खाडेकर, राजेश नागरीकर, शहानंट मोटघरे,. निशिगंध ढोलणे,ए.एस वाडीभरने, एमएम बोरकर, पितावर मेळे हे शिक्षक उपस्थित होते.