गोंदिया : उत्तम संस्कारातील मुले, चांगले आणि वाईट जाणत्या वयातच कळणारी मुले, प्रगत व संस्कारी समाजाचा घटक होऊ शकतात. त्यामुळे आई ही एकच व्यक्ती अगदी तिसऱ्या ते सातव्या वर्षापर्यंत उत्तम संस्कारी मुले घडू शकते. सुदृढ समाजासाठी संस्कारक्षम पिढीचे असणे आवश्यक आहे, भारतीय अशिक्षित समाजावर महिला शिक्षणाचे महत्त्व बिंबविणाऱ्या सावित्रीबाई त्यामुळे देशाच्या आद्य शिक्षिका आहेत. हा देश त्यांच्या विचाराने प्रगती करू शकतो म्हणूनच त्यांच्या विचारांना उजाळा मिळावा म्हणून युवा पर्व सुपर वूमन,युवा कुणबी संघटना गोंदिया व राधाबाई नर्सिंग स्कूल च्या वतीने “मी सावित्री बोलतेय” या एकांकिका स्पर्धा स्थानिक राधाबाई नर्सिंग स्कूल मध्ये घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी ज्योती बागडे,अनिता देशभ्रतार,तृप्ती कालटकर,पौर्णिमा गौर,वैशाखा श्यामकुवर ,ज्योस्विनी कावळे,रविना गजभिये ,शीतल गावड,स्नेहल नेवारे,राशी श्रीरंगे,निकिता डोंगरे,विद्या दुग्गा,अश्विनी ,नेहा शेंडे यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर आधारित विविध कार्यक्रम सादर केले.
“मी सावित्री बोलतेय” या एकांकिका स्पर्धेमध्ये रिया गाजीपूरे हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक सौ.सारिका गुप्ता,तृतीय क्रमांक सौ.मंजुषा फुंडे यांनी पटकाविला.सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.याकार्यक्रमादरम्यान युवा कुणबी संघटनेचे सचिव गजेंद्र फुंडे,शैलेश फुंडे ,शैलेंद्र अहिरकर व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन ज्योत्सना कोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ चारुशीला भांडारकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा पर्व सुपर वूमन च्या संचालिका सौ प्राची प्रमोद गुडधे,सौ मंजुषा फुंडे,सौ शारदा ब्राह्मणकर ,सौ स्मिता कुथे ,सौ संध्या डोंगरवार,सौ नंदा राऊत ,सौ मंदा गायधने ,सौ अर्चना ठवरे ,सौ किरण भेंडारकर ,सौ स्वीटी फुंडे,सौ.समीक्षा पटले,मौसमी शुक्ला ,सौ माया सोनेकर ,सौ मोना दियेवार ,सौ आशा बेले,सौ अनिता डोंगरवार,सौ वंदना उपरिकर ,सौ अल्का बनकर,सौ प्रीती विठ्ठले,सौ अनिता बनकर,सौ पुजा गायधने व राधाबाई नर्सिंग स्कूल च्या पदाधिकारी यांनी अथक परिश्रम केले